|
Article Details :: |
|
Article Name : | | माध्यमिक शालांत परीक्षेतील क्रीडा विषयक प्रोत्साहनात्मक गुणांचा विद्यार्थ्याच्या सहभागावर झालेल्या परिणामांचे अध्ययन | Author Name : | | सागर प्र. नारखेडे , प्रकाश भा. नंदूरकर | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ISRJ-323 | Article URL : | | | Author Profile | Abstract : | | शारीरिक शिक्षण तसेच खेळ व क्रीडा हा विद्यार्थी दशेतील व्यक्तीमत्व विकासातील महत्वाचा घटक आहे. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांच्या क्रीडा स्पर्धेतील सहभाग महत्वाचा आहे. विध्यार्थ्याच्या खेळांमधील सहभाग जास्तीत जास्त वाढावा आणि चांगले खेळाडू निर्माण व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाद्वारे दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्याना राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतल्याबद्दल क्रीडा सवलतीचे 25 गुण देण्यात येतात. या क्रीडा विषयक प्रोत्साहनात्मक गुण तरतुदीचा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेंतील सहभागावर काय परिणाम झाला हे बघण्यासाठी संशोधकाने सदर विषयाची निवड केली आहे. संशोधनाकरिता अमरावती विभागातील सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच अमरावती विभागीय शिक्षण मंडळ, अमरावती यांच्या कार्यालयातून माहिती संकलित करण्यात आली. | Keywords : | | - क्रीडा
- शारीरिक शिक्षण
- व्यक्तीमत्व विकास
- अध्ययन
|
|
|